नाशिक - अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सातपुर येथील एका कोल्ड स्टोरेज वर छापा मारून लाखो रुपयांची मिरची आणि धने पावडर जप्त करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केलेली ही कारवाई अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
हे ही वाचा : वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची बदली रद्द करण्यासाठी एकवटले नागरिक
अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर भेसळयुक्त अन्न पदार्थांवर कार्यवाही घेण्याबाबतची मोहिम हाती घेतली असून जनतेस दर्जेदार व भेसळीविरहीत अन्न पदार्थ मिळावे या करीता अन्न व औषध प्रशासन विभाग प्रयत्न करीत आहे .
अन्न व औषध प्रशासनाद्वारे सातपूर येथील नारंग कोल्ड स्टोरेज या ठिकाणी धाड टाकुन तपासणी केली असता त्या ठिकाणी कुठलेही लेबल नसलेल्या मार्च 2023 पासुन साठविलेल्या मिरची पावडर 10108 किलो किंमत रुपये 16 लाख 67 हजार 820 रुपये किंमत असलेला व धने पावडर 4,278 किलो किंमत रुपये 2 लाख 35 हजार 290 किमतीचा साठा भेसळीच्या संशयावरुन अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत नमुने घेवुन जप्त केला.
ब्रेकिंग न्यूज : कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक मनोहर कारडा यांची रेल्वे खाली आत्महत्या
हा साठा हा मे. जे. सी. शहा ॲण्ड कंपनी, 13, इश्वर रेसीडेंसी, द्वारका, नाशिक या पेढीचा असून या प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषकास पाठविण्यात येत असून अहवाल आल्यावर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी सह आयुक्त नाशिक विभाग, सं. भा. नारगुडे तसेच सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड, मनिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.