नाशिक (प्रतिनिधी) : मोलकरणीने घरातून नऊ तोळे दागिने लंपास केल्याची घटना कॅनडा कॉर्नर येथे घडली. फिर्यादी अलका प्रणव जांभेकर (वय 46, रा. स्नेहजीवन कॉलनी, कॅनडा कॉर्नर) या प्रसिद्ध वकील असून, त्यांच्याकडे किरण महेश वाघरी (डाबी) ही त्यांच्याकडे कामाला होती. दरम्यान, दि. 2 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत या मोलकरणीने जांभेकर यांच्या घरात असलेले 3 लाख 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
दरम्यान, ॲड. जांभेकर यांच्या भाच्याचे लग्न होते. त्यासाठी हे दागिने जांभेकर यांनी पाहिले असता त्यावेळी दागिने घरातून चोरी झाल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर अलका जांभेकर यांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र दागिने मिळून आले नाहीत.
त्यामध्ये पाच तोळे वजनाची दीड लाख रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ, 50 हजार रुपये किमतीची सोने व डायमंडची रिंग, 70 हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची डायमंडचे पेंडंट असलेली सोन्याची चेन, 60 हजार रुपये किमतीची दीड तोळे वजनाची सोन्याचे पेंडंट असलेली सोन्याची चेन, 15 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स असा ऐवज मोलकरणीने चोरून नेला. अखेर सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित किरण वाघरी हिच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.