नाशिक (प्रतिनिधी) :- जालना येथे झालेला प्रकार हा निंदनीय आहे. सरकार यासाठी सर्व ते प्रयत्न करीत असून, नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन राज्याचे अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आम्ही सर्व जण सरकारच्या वतीने न्यायालयीन लढाई ताकदीने लढत आहोत.
राज्यात होणाऱ्या शांततामय आंदोलनास आम्हा सर्वांचा पाठिंबा आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधव शांततेत आंदोलन करीत होते. त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्या व बळाचा वापर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची ठाम भूमिका आहे.
मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले आहेत. मी राज्यातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो व या लढाईत आम्ही सारे मराठा आंदोलकांसोबत आहोत, असे आश्वासित करतो, असे शेवटी म्हटले आहे.