50 हजार रुपयांची लाच मागणारा जिल्हा क्षयरोग अधिकारी जाळ्यात
50 हजार रुपयांची लाच मागणारा जिल्हा क्षयरोग अधिकारी जाळ्यात
img
Dipali Ghadwaje
नाशिक :- 50 हजार रुपये लाचेची  मागणी करणाऱ्या जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. डॉ. देवराम किसन लांडे (वय 52), तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव व सध्या नेमणूक जिल्हा क्षयरोग अधिकारी, जळगाव तसेच तालुका आरोग्य अधिकारी पाचोरा जि. जळगाव असे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता भाड्याने देण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव येथे अर्ज सादर केला होता.

तक्रारदार यांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेवून त्यांना नियमित भाडे सुरू करण्याकरिता डॉ. देवराम लांडे यांनी तक्रारदाराकडे 50,000 रुपये लाचेची मागणी केली. लाच मागितल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाल सापळा अधिकारी अभिषेक पाटील, पो नि रूपाली खांडवी, पोहवा राजन कदम, शरद कटके, पोशि संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील चालक पोहवा सुधीर मोरे यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group