2 हजारांची लाच घेताना सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यास एसीबीने रंगेहाथ पकडले
2 हजारांची लाच घेताना सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यास एसीबीने रंगेहाथ पकडले
img
दैनिक भ्रमर

नाशिक : 2 हजारांची लाच घेताना सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

बन्सीलाल महादू पाटील (वय 53) असे लाच घेणाऱ्या कळवणच्या सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना प्रकल्प अधिकारी कळवण यांचे आदेशान्वये आश्रम शाळेवर हजर करून न घेतल्याने तक्रारदार हे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पाटील यांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे मुख्याध्यापक यांना हजर करून घ्या असे सांगून मदत करण्याचे सांगण्याचे मोबदल्यात 5,000  रुपये लाच मागितली.


तडजोडी अंती आज 2,000 रुपये लाचेची रक्कम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण येथे स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group