रायगडावरुन वाजणार लोकसभेची तुतारी! नव्या चिन्हाच्या लॉन्चिंगसाठी खास सोहळा
रायगडावरुन वाजणार लोकसभेची तुतारी! नव्या चिन्हाच्या लॉन्चिंगसाठी खास सोहळा
img
Dipali Ghadwaje
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव मिळाले. काल निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हही देण्यात आले आहे. 

नवे चिन्ह घेऊन निवडणुकांच्या रणांगणात उतरण्याचे मोठे आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. या नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी शरद पवार गटाकडून एक खास सोहळा आयोजित करण्यात आला असून रायगडावरुन शरद पवार गट लोकसभा निवडणुकांची तुतारी फुंकणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी उद्या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचे लॉन्चिंग करत लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे.

दरम्यान उद्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group