लोकसभा निवडणुकीची घोषणा
लोकसभा निवडणुकीची घोषणा "या" तारखेला होण्याची शक्यता; 7 टप्प्यात पार पडणार मतदान?
img
Dipali Ghadwaje
16 जून 2024 रोजी 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून  लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.    लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे. 

लोकसभा निवडणुकीकडं आता अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाकडून केव्हा निवडणुकीचा कार्यक्रम कधी घोषित होतो याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच आता ही घोषणा १३ किंवा १४ मार्च रोजी होईल, अशी माहिती एका वृत्त संस्थेच्या सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.  

मार्चच्या मध्यात अर्थात १३ किंवा १५ मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यास त्यानंतर साधारण महिन्याभरानं प्रत्यक्ष निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण आचार संहिता निवडणुकी घोषणा झाल्या झाल्याच म्हणजेच १४ किंवा १५ मार्च रोजी लागू शकते.

दरम्यान, यंदाची लोकसभा निवडणूक २०१९ प्रमाणेच ७ टप्प्यात होईल, तर पहिल्या टप्प्यातील मतदान हे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होईल, असंही माध्यमानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

सध्या निवडणूक आयोग देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे. सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. निवडणूक आयोगाचे अधिकारी प्रत्येक राज्याचा दौरा करुन आढावा घेत आहेत. सर्व राज्यातील तयारीचा आढावा घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group