नाशिकमध्ये युवकाची २५ लाखांची फसवणूक; वाचा नेमके काय आहे प्रकरण
नाशिकमध्ये युवकाची २५ लाखांची फसवणूक; वाचा नेमके काय आहे प्रकरण
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) :- अ‍ॅपद्वारे गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून एका तरूणाची सुमारे २५ लाख ३१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी विशाल सतिश सोनवणे (वय ३१, रा. भवानीपार्क अपार्टमेंट, जयभवानीरोड, नाशिकरोड) हे गुंतवणुकीच्या उद्देशाने वेगवेगळ्या साईट चेक करत होते. त्या दरम्यान वेगवेगळ्या दोन व्हर्च्युअल मोबाईल नंबरच्या व्हॉट्स अ‍ॅप वरून अमृता शर्मा, डेरिंग मॅडम यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. सेनी ट्रेडर ह्या अ‍ॅपद्वारे गुंतवणूक केल्यावर जादा परतावा मिळण्याचे आमिष दाखवले. तसेच निलेश पद्माकर खर्डे यांची सैनी कंपनीतील एका लिंकद्वारे क्लिक करून ऑफिशीयल ग्रुप तयार केला. 

या ग्रुपवरील आरोपी विद्या तालका यांचे वेगवेगळे व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक, डेरिंग मॅडम, अजय माथुर, मनोज कोहली, नलिनी यांच्या वेगवेगळ्या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावरील अनोळखी इसमांनी फिर्यादी विशाल सोनवणे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना गुंतवणूक केल्यास त्यावर जादा परतावा मिळण्याचे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी सोनवणे यांनी वेळोवेळी यात गुंतवणूक केली. आरोपींनी जादा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून एकूण ९ लाख ९ हजार रुपये वेळोवेळी जमा करण्यास सांगून एकूण २५ लाख ३१ हजार ६८७ रुपये वेगवेगळ्या खात्यात जमा करण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार १ ऑगस्ट २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत इंटरनेट व फोनद्वारे घडला. 

ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवणूक करूनही जादा परतावा मिळाला नाहीच, परंतु आहे ती रक्कमही परत मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या सोनवणे यांची फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहे. 

इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group