नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.सूर्यकांत रहाळकर सर यांचे आज बुधवार दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १:३० वा. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर पंचवटी, अमरधाम, येथे सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पूर्वी पार्थिवाचे अंत्यदर्शन सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत संस्थेच्या पेठे विद्यालय ,रविवार कारंजा, नाशिक येथे घेता येऊ शकेल. प्रा. रहाळकर सर यांच्या निधनाने नाशिक एज्युकेशन सोसायटी परिवार शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या या दुःखात भ्रमर परिवार सहभागी आहे.