नाशिक (प्रतिनिधी) :- मनमाडमध्ये गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून आयबी व एटीएसने संयुक्त कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे. मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रीकरण केल्याचा संशयावरून त्यास ताब्यात घेण्यात आले होते.
राज्यभरासह नाशिक जिल्ह्यात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. मनमाड शहरात ही कारवाई करण्यात आली असून सगळीकडे गणेशोत्सवाचा माहोल असताना एक संशयित शहरातील गणेश मंडळांचे चित्रीकरण करत असताना त्यास ताब्यात घेण्यात आले.
काही तासांच्या चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आल्याचे समजते. हा संशयित चित्रीकरण करून ट्रेनने जात असताना येवला तालुक्यातील नगरसुल येथून त्यास ताब्यात घेतले होते.