मोदींच्या सभेत जाणारे कांदा उत्पादक पोलिसांच्या नजरकैदेत
मोदींच्या सभेत जाणारे कांदा उत्पादक पोलिसांच्या नजरकैदेत
img
दैनिक भ्रमर
लासलगाव (भ्रमर वार्ताहर) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील जाहीर सभेसाठी निघालेल्या त्रस्त कांदा उत्पादकांचे प्रतिनिधी सभेस्थळी निघाले. त्यांनी कांद्याच्या माळा घालून कांदा निर्यातबंदी विरोधात जोरदार घोषणा दिल्या. 

लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर, डॉ. सुजित गुंजाळ, शिवा सुराशे, डॉ. विकास चांदर, विकास रायते, महेश होळकर, संतोष पानगव्हाणे, गोकुळ पाटील, प्रमोद पाटील, भरत होळकर, राहुल शेजवळ, मयूर बोरा यांच्यासह दहा ते बारा जणांना लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब खंडाळ यांनी पोलीस कर्मचारी सुजित बारगळ यांच्यासह साध्या वेशातल्या पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. मोदींची सभा संपेपर्यंत या लोकांना पोलीस ठाण्यातच नजरकैदेत ठेवण्यात येईल, असे समजते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group