पतीचा पाठलाग करीत पत्नी पोहोचली थेट मसाज पार्लरमध्ये अन्‌‍...
पतीचा पाठलाग करीत पत्नी पोहोचली थेट मसाज पार्लरमध्ये अन्‌‍...
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- रंगेल पतीवर संशय असल्याने पत्नीने त्याचा पाठलाग केला असता तिने त्याला मसाज पार्लरमध्ये रंगेहाथ पकडले. पतीवर संशय आल्याने पत्नीने हा प्रकार केल्याचे समोर आले. ही घटना नाशिकच्या पारिजातनगर येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, की पारिजातनगरमध्ये हे उच्चशिक्षित दाम्पत्य वास्तव्यास आहे. दोघांमध्ये बोलणे कमी झाले होते. त्यादरम्यान पतीची ओळख एका महिलेशी झाली. नंतर त्यांची मैत्री अधिकच वाढत गेली. त्यामुळे महिलेला आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याची शंका निर्माण झाली होती. एक दिवस तिने त्याचे कॉल रेकॉर्डिंग ऐकले. त्यानंतर ती थेट त्याचा पाठलाग करू लागली.

तो मसाज पार्लरमध्ये गेल्याचे समजताच ती पण तेथे गेली. मसाज पार्लरमध्ये पतीने तिला पाहताच त्याची पळताभुई थोडी झाली. त्या दोघांमध्ये पार्लरमध्येच वादविवाद झाले. त्याचे रूपांतर हाणामारीतही झाले. प्रकरण वाढत असल्याने ते थेट गंगापूर पोलीस ठाण्यात गेले. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीची तक्रार घेतली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group