नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून गेडाम यांची ख्याती आहे. नाशिकमध्ये मनपा आयुक्त म्हणून त्यांनी काम पहिले होते.विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे हे दि. 31 मे रोजी निवृत्त झाले असून, त्यांच्या जागी कृषी विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती झाली आहे.
अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी याबाबत आदेश काढला असून, डॉ. प्रवीण गेडाम यांनी तातडीने पदभार स्वीकारावा, असे म्हटले आहे. डॉ. प्रवीण गेडाम यांनीदेखील महापालिका व अन्य खात्यांतर्गत नाशिकमध्ये काम केलेले अधिकारी आहेत.
लवकरच लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपत आहे. त्यामुळे ठप्प झालेली विकास कामे, विविध अनुदाने व वितरण, पाऊस लवकर न पडल्यास दुष्काळग्रस्तांना मदत आदी प्रश्न त्यांना प्राधान्याने हाताळावे लागणार आहेत.