Nashik : इन्स्टाग्रामवर लिंक पाठवून आयपीओ घेण्यास भाग  पाडत दीड कोटींना फसविले
Nashik : इन्स्टाग्रामवर लिंक पाठवून आयपीओ घेण्यास भाग पाडत दीड कोटींना फसविले
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- इन्स्टाग्राम प्रोफाईलवर लिंक पाठवून स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून एका इसमासह साक्षीदारांची सुमारे दीड कोटी रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी व इतर साक्षीदार यांना अज्ञात आरोपींनी संगनमत करून इन्स्टाग्राम प्रोफाईलवर लिंक पाठविली व त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवरून वेळोवेळी फिर्यादी व साक्षीदाराबरोबर संपर्क साधला. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून आरोपीने अपर सर्किटच्या स्टॉकबद्दल वेळोवेळी माहिती दिली व हे स्टॉक व आयपीओ घेण्याकरिता फिर्यादी व साक्षीदार याला भाग पाडून त्यांची एकूण १ कोटी ५७ लाख १ हजार १०८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. 

हा प्रकार २८ मार्च ते २० मे २०२४ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घडला. या प्रकरणी सोशल मीडिया इन्स्टाग्राम प्रोफाईलधारक व व्हॉट्सअ‍ॅप मोबाईलधारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group