नाशिक : दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी ही नाशिक शहरातून वाहत असल्याने नाशिक शहराला तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. केवळ राज्यातील व देशभरातीलच नव्हे तर जगभरातील भाविक पर्यटक व नागरिक या ठिकाणी दररोज प्रचंड संख्येने भेट देत असतात. गोदा घाटावर रामकुंडाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असल्याने या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून गोदावरी सुरू आहे. गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने ही आरती होत असतानाच रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने देखील गोदा आरती सुरू करण्यात आली आहे. दरम्यान दोघांमध्ये वेगवेगळ्या आरती ऐवजी एकच आरती करावी, असे यासाठी बरीच खलबते आणि चर्चा झाली. मात्र त्यातून तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे दररोज सायंकाळी येथे दोन वेगवेगळ्या गोदावरी आरत्या होत असतात.
गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने रामकुंडावर गोदावरी होत असतानाच नजिकच दुसऱ्या बाजूला रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने देखील आरती होते. या ठिकाणी रामतीर्थ सेवा समिती करिता पायऱ्यांवर चौथारा तथा ओटा बांधण्यात येणार आहे. मात्र गंगा गोदावरी पुरोहित संघाने त्याला विरोध दर्शविला असून अशा प्रकारचे बांधकाम करू नये कसे झाल्यास आम्ही आणखी आक्रमक पवित्रा घेऊ असे पुरोहित संघाचे म्हणणे आहे. आज सकाळी या ठिकाणी बांधकामाला विरोध दर्शवीत गंगा गोदावरी पुरोहित संघाने ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
आंदोलना दरम्यान पोलीस आणि पुरोगामी संघात शाब्दिक बाचाबाची झाल्याचेही दिसून आले. सध्या रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने दररोज शासकीय गोदावरी आरती सुरु आहे. याच आरतीसाठी नदीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाला पुरोहित संघाने कडाडून विरोध केला आहे.
पुरोहित संघाने बांधकामाला विरोध दर्शवत हे बांधकाम करू नये, बांधकाम करायचे असेल तर आमच्या डोक्यात येथे दगड घालून आम्हाला या ठिकाणी बळी द्या, आम्ही हुतात्मा स्वीकारायला तयार आहोत, अशी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहेत. त्यानंतर रामकुंड येथे पंचवटी पोलीस दाखल झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.