१६ जुलै २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शासनाने महाराष्ट्र स्थावर संपदा नियमक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती केली आहे. ते लवकरच आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
केंद्र शासनाने लागू केलेल्या स्थावर संपदा या नियमानुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्थावर संपदा नियम प्राधिकरण स्थापन केले आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी आणि राज्याचे माजी मुख्य सचिव अजय मेहता यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यांची मुदत ही येत्या दि. 20 सप्टेंबर रोजी संपत असून, त्यांच्या रिक्त पदावर ती नियुक्त करण्यासाठी शासनाच्या समितीने राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या नावाची शिफारस केली होती. सौनिक हे नाशिकचे माजी जिल्हाधिकारी होत.
समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्याचे उपसचिव अजित कवडे यांनी शासन निर्णय रेरा/1024/प्रक्र10/1/दुवपु 2 या आदेशानुसार राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ते स्वीकारतील त्या दिवसापासून ते या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
Copyright ©2024 Bhramar