भगूरच्या युवकाची सौभाग्यनगर येथील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
भगूरच्या युवकाची सौभाग्यनगर येथील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- विहितगांव जवळील सौभाग्यनगर येथील इमारतीवरून आय टी इंजिनियर असलेल्या युवकाने उडी मारून आत्महत्या केली असून उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मित गुन्ह्याची नोद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, भगूर येथील श्री रेणुका माता मंदिर जवळील कासार मळा येथे राहणारा रोहित भाऊसाहेब वाजे (वय 23) हा युवक आज सकाळी 11वाजेच्या सुमारास भगूर वरून नाशिकरोड कडे येत असतांना त्याने विहितगांव जवळील सौभाग्यनगर येथील रेणुका गार्डन शेजारील नवीन होत असलेल्या अष्टप्रद हाईटज या इमारतीच्या खाली आपली दुचाकी लावली. नंतर तो इमारती वर गेला आणि पाचव्या मजल्या वरून स्वतः खाली झोकून आत्महत्या केली.

रोहित वाजे हा युवक आय टी इंजिनियर असून तो पुण्याच्या कंपनीमध्ये काम करीत होता. मात्र वर्क फ्रॉम होम या तत्वावर तो घरून काम करीत असत. अतिशय शांत स्वभाव असल्याने तो सर्वत्र परिचित होता. त्याचे वडील भाऊसाहेब वाजे हे आर्सेंटीलरी सेंटर मधील एम ई एस विभागात काम करून सेवानिवृत्त झाले आहेत.

त्याच्या पश्चच्यात आई वडील व बहीण असा परिवार असून तो एकुलता एक मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनगर पोलिसात या प्रकरणी अकस्मित मृत्युची नोंद केली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कोकाटे, पोलीस अंमलदार गणेश कुमावत करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group