शिकार आणि शिकारी दोघांचा विजेचा शॉक लागून मृत्यू
शिकार आणि शिकारी दोघांचा विजेचा शॉक लागून मृत्यू
img
चंद्रशेखर गोसावी

पिंपळगाव बसवंत :- शिकार आणि शिकारी यांच्यामध्ये सुरू असलेल्या लपाछपीमध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील एका खेड्यामध्ये घडली आहे. 

याबाबत वनविभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील पिंपळगाव बसवंत येथे आज वरील दुर्देवी घटना घडली. यामुळे वन्यप्रेमी पशु प्रेमींमध्ये हळहळ करण्यात येत आहे. घागरनाला नाला ओहळमधील वस्तीवरील विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या विजेचा धक्का लागून मोर व बिबट्याचा मृत्यू झाला.

पिंपळगाव बसवंत लगत ऊंबरखेड परिसरात अलीकडे बिबट्याचा वावर सुरू होता. सदरचा बिबट्या पहाटेच्या सुमारास शिकारीसाठी मोराच्या पाठीमागे लागला. मात्र, मोर विद्युत विज ट्रान्सफॉर्मरवर आत जाऊन बसला असता त्यास पकडण्यासाठी बिबट्या विद्युत रोहित्रावर चढला. दरम्यान या विज ट्रान्सफॉर्मरचा बिबट्याला धक्का लागला व शॉक लागून बिबट्याचा मृत्यू झाला.

तसेच या घटनेत शॉक लागून मोराचा देखील मृत्यू झाला आहे. नर जातीचा बिबट्या असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करीत मृत मोर व बिबट्या ताब्यात घेतला आहे. थोडक्यात काय तर या घटनेत शिकार आणि शिकारी नुसते घायाळ झाले नाही तर मृत्यूच्या दारात पोहोचले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group