नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील पहिला निकाल तब्बल साडेअकरा तासांनी जाहीर झाला.
निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. जालिंदर ताडगे यांनी नाशिक व इगतपुरी या दोन तालुक्यांच्या चार संचालकांच्या विजयाची घोषणा केली. त्यामध्ये प्रगती पॅनलने आघाडी घेतली असून चार जागांसाठी झालेल्या या मतमोजणीत तीन उमेदवार प्रगती पॅनलचे त्यात प्रल्हाद त्र्यंबक काकड (२५४१), प्रकाश दत्तू घुगे (२४३९), बाळासाहेब संपतराव धात्रक (२३२५) तर परिवर्तन पॅनलचे गोकुळ केशव काकड (२२२२) हे चार संचालक विजयी झाले.