नाशिकच्या मनमाडमध्ये मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांच्या वादातून माजी नगरसेविका नुतन पगारे यांच्या मुलगा शुभम देविदास पगारे याची हत्या झाली. या घटनेने मनमाड मध्ये खळबळ उडाली.
त्याला मारहाण करणारा दादू नामक तरुणदेखील गंभीर जखमी झाला आहे. शुभम पगारे हा माजी नगरसेविका यांचा मुलगा आहे. मनमाडच्या पांडुरंग नगर भागात त्यांच्यात झालेल्या किरकोळ वाद झाला होता.
वादातून या दोघांनी एकमेकांवर धारदार हत्याराने वार केले. त्यात शुभमचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मनमाड शहर हादरले असून पोलिसांनी खबरदारी म्हणून दोघेही राहत असलेल्या भागात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.