कसारा घाटात 300 फूट दरीत आयशर कोसळून 2 जण ठार
कसारा घाटात 300 फूट दरीत आयशर कोसळून 2 जण ठार
img
Dipali Ghadwaje
 इगतपुरी (भास्कर सोनवणे) :  नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटात आशर गाडी दरीमध्ये कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मध्यरात्रीच्या सुमारास तीनशे फुट खोल दरीत आयशर कोसळल्याने 2 जण जागीच ठार झाले आहेत. 

कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. अपघातग्रस्त आयशर थेट संरक्षक भिंतीचे कठडे तोडून 300 फुट खोल दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटी व आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांना अनेक तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. अपघातातील दोन्ही मृतदेह जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group