सातपूर परिसरात राष्ट्रवादीला मोठे खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
सातपूर परिसरात राष्ट्रवादीला मोठे खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
img
दैनिक भ्रमर

सातपुर -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक शहर उपाध्यक्ष तसेच जनविकास फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब जाधव यांनी काल मुंबईत आ.सिमा हिरे, भाजप नेते महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संघटनमंत्री रवि अनासपुरे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात  प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्यात बाळासाहेब जाधव यांच्यासोबत महेश जाधव, जन विकास फाउंडेशनचे रामकृष्ण जाधव, संजय तांबे, उमेश ठोंबरे, अरुण लांडगे, प्रकाश सुराशे आदि पदाधिकार्यांनीही यावेळी भाजपात प्रवेश केला आहे.

भाजपा पक्ष प्रवेशावेळी बाळासाहेब जाधव यांनी पक्षाच्या विकासाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करीत, भाजपाच्या नेतृत्वात आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करणार असल्याचं सांगितले.

या प्रवेश सोहळ्या प्रसंगी शिवाजी शहाणे, राजेंद्र दराडे, संजय राऊत, निलेश जोशी, गणेश बोलकर, मंगला खोटरे यांच्यासह सातपूर भाजपाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group