नरेश कारडा यांना जामीन मंजूर, न्यायालयाचा कारडा यांना तात्पुरता दिलासा
नरेश कारडा यांना जामीन मंजूर, न्यायालयाचा कारडा यांना तात्पुरता दिलासा
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी):- फसवणूक प्रकरणी कारागृहात असलेल्या नरेश कारडा यांना न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना अंतरीम जमीन मंजूर झाला आहे.

आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी राहुल लुणावत यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी नरेश कारडा, मनोहर कारडा यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. नरेश कारडा यांना अटक झाल्यानंतर व्यथीत झालेल्या मनोहर कारडा यांनी रेल्वे समोर आत्महत्या केली होती. त्यानंतर अनेक तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेत तर उपनगर पोलिसात दोन गुन्हे दाखल झाले.

पोलीस कोठडी संपल्यानंतर नरेश कारडा यांना न्यायालीन कोठडी कोर्टाने सुनावली. ॲड. राहुल कासलीवाल यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केल्या नंतर कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने नरेश कारडा यांना मुबंई नाका येथील गुन्ह्यात अंतरीम जमीन मंजूर केला तर उपनगर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटकपूर्व जमीन दिल्याचे समजले.

त्यामुळे कारडा यांची दिवाळी घरीच होणार असल्याचे बोलले जात आहे. ॲड. कासलीवाल यांना सिंधी समाजाचे ज्येष्ठ वकील अनिल आहुजा यांनी मदत केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group