आगामी निवडणुकीसाठी शरद पवारांचा मास्टर प्लॅन! म्हणाले....
आगामी निवडणुकीसाठी शरद पवारांचा मास्टर प्लॅन! म्हणाले....
img
Dipali Ghadwaje
आगामी निवडणुकीत पवार विरुद्ध पवार, असा संघर्ष पाहायाला मिळणार आहे. अजित पवार यांनी लोकसभेच्या ४ जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये बारामतीचा देखील सहभाग आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात बैठक घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर थेट टीका करणे टाळले. युवा नेत्यांना बळ देऊ शकलो, तर आगामी निवडणुकीत तुम्हाला मोठे यश मिळेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
 
"पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी करण्याची गरज नाही. त्यांची काळजी करण्यापेक्षा आपण नागरिकांचे प्रश्न हाती घेऊन ते सोडवले पाहिजेत. जर आम्ही आमच्या युवा नेत्यांना बळ देऊ शकलो, तर आगामी निवडणुकीत तुम्हाला मोठे यश मिळेल. त्यामुळे आपण कामाला लागावे आणि आपली विचारधारा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे मला खात्री आहे की आपण हे करू शकलो तर, आम्ही तरुण नेते उदयास येताना पाहणार आहोत," असे शरद पवार म्हणाले.
 
दरम्यान अजित पवारांसह अनेक आमदारांनी साथ सोडल्यामुळे शरद पवार आता नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत. त्यामुळे ही शरद पवार गटाची जमेची बाजू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group