नेपाळमधील पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात, ४३ प्रवासी जखमी ; चौघांची प्रकृती चिंताजनक
नेपाळमधील पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात, ४३ प्रवासी जखमी ; चौघांची प्रकृती चिंताजनक
img
Dipali Ghadwaje
पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर पेठ जवळ जागेवर उभ्या असलेल्या ट्रकला बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात बसमधील ४३ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नेपाळवरुन देवदर्शन आणि पर्यटनस्थळांना भेटीसाठी आलेल्या नेपाळी प्रवाशांच्या बसचा पुणे - नाशिक महामार्गावर  भीषण अपघात झाला. महामार्गावर पेठ जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली. या धडकेत बसमधील ४३ प्रवासी जखमी झालेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत अपघातग्रस्त लोकांची मदत केली. दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात येत आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group