दुर्दैवी  :  लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
दुर्दैवी : लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
नागपूर :   रस्ते अपघाताच्या घटनानांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये क्वॉलीस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली. 


याबाबत मिळालेल्या महितिनुसार,हा अपघात काल (शुक्रवारी) मध्यरात्री तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडीयेतेहै घडला आहे.  क्वालीस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेनं जात असताना ट्रकनं गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटपून हे सर्वजण काटोलच्या दिशेनं जात होते त्यावेळी भीषण अपघात झाला. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

अपघातातील मृतांची नावे : 
अजय दशरथ चिखले (वय 45)
विठ्ठल दिगंबर थोटे (वय 45)
सुधाकर रामचंद्र मानकर (वय 42)
रमेश ओंकार हेलोंडे (वय 48)
मयूर मोरेश्वर इंगळे (वय  26)
वैभव साहेबराव चिखले (वय 32)

अपघाताची मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एका क्वॉलीस कारमधून सात जण नागपूरहून काटोलच्या दिशेनं प्रवास करत होते. नागपुरात एका लग्नाही हे सातही जण उपस्थित राहण्यासाठी आले होते. रात्री उशीरा नागपुरातील लग्नाचा कार्यक्रम आटपून सातहीजण आपल्या घरी निघाले होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळानं घाला घातला. नागपूरहून काटोलच्या दिशेनं जात असताना समोरून येणाऱ्या एका ट्रकनं क्वॉलीस गाडीला धडक दिली. 

ट्रकन क्वॉलीस गाडीला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. अपघातात क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये जखमीवर उपचार सुरू आहेत. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात क्वॉलीस गाडीचा चक्काचूर झाला आहे. 

अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. काही स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना अपघातासंदर्भात माहिती देण्यात आली. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर सध्या नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group