नाशिकला आज पर्वणी! मोदींचा रोड शो, राष्ट्रीय युवा महोत्सव उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम अन् बरंच कांही...
नाशिकला आज पर्वणी! मोदींचा रोड शो, राष्ट्रीय युवा महोत्सव उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम अन् बरंच कांही...
img
Dipali Ghadwaje
नाशिक : २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला आजपासून नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी नाशिकमध्ये दिसून येत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते नाशकात दाखल होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात दाखल होताच त्यांचा रोड शो होणार आहे. संपूर्ण नाशिककर पंतप्रधान मोदींच्या रोड शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. मोदींच्या रोड शो साठी एक खास कार तयार करण्यात आली आहे.  

मोदींच्या रोड शोसाठी खास कार
नरेंद्र मोदींच्या नाशिक रोड शो साठी एक आलिशान गाडी सजवण्यात आली आहे. या गाडीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. याच वाहनातून पंतप्रधान मोदी हे रोड शो करतील. मोदी गाडीतून रोड शो करतील. त्यांच्या बाजूला त्यांची सुरक्षा व्यवस्था तैनात असेल. रोड शो सुमारे १.२ किमीचा असेल. मिरची सिग्नलपासून ते जनार्धन स्वामी मठापर्यंत रोड शो होणार आहे. यावेळी सुमारे १ ते दीड लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अत्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.   

पंचवटीत प्रभू रामाचे दर्शन अन् रामकुंडावर जलपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर असून ऐतिहासिक काळाराम मंदिरात ते दर्शन घेणार आहेत. जवळपास 23 मिनिटं ते मंदिरात असणार असून विधिवत पूजा करत प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. मोदी पूर्व महाद्वाराने मंदिरात प्रवेश करतील आणि प्रथम हनुमानाचे दर्शन घेतील. त्यानंतर प्रधान संकल्प केला जाईल, भावार्थ रामायणाचा पाठ केला जाईल आणि रामरक्षा पठण होईल, अशी माहिती महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली आहे. 

सभास्थळी चोख तपासणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवनातील सभास्थळी नागरिकांची चोख तपासणी करून प्रवेश दिला जाणार आहे. सभेच्या मैदानात कोणालाही काहीच नेता येणार नाही. पोलीस अंमलदारांकडून धातूशोधक यंत्रांसह  कृत्रिमरित्या शारीरिक तपासणी होणार आहे. त्यानंतरच सभास्थळी प्रवेश दिला जाईल. 

 


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group