नाशिकच्या काळाराम मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी; दर्शनासाठी लांबच लांब रांगा
नाशिकच्या काळाराम मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी; दर्शनासाठी लांबच लांब रांगा
img
Dipali Ghadwaje

नाशिक :  सियावर रामचंद्र की जय l श्रीराम जय राम जय जय राम ll असा प्रभू रामाचा जप करीत नाशिकच्या काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. आजच्या विशेष पर्वावर प्रत्येकाला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे क्षण याची देही याची डोळा पाहण्याची इच्छा आहे. मात्र ते शक्य नसल्यानं नाशिकच्या काळारामाचं दर्शन घेवून भाविक श्री रामनामाचा जागर करतायत. त्यामुळे काळाराम मंदिर जय श्री रामच्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे.

अयोध्येत आज पंतप्रधानांचे नरेंद्र मोदींच्या हस्ते श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे, या पार्श्वभूमीवर पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात गेल्या दोन दिवसापासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. या तीन दिवसीय आनंद सोहळ्यात विविध ठिकाणचे भाविक येऊन आपला सहभाग नोंदवीत आहेत.

आज पहाटे काकड आरती व व पूजन झाल्यानंतर सकाळी आठ वाजता दया कुलकर्णी यांचे कीर्तन झाले. त्यानंतर कामेश्वर फक्त मंडळाचे भजन झाले दुपारी महाराजांचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या काळाराम  मंदिराच्या परिसरात अयोध्येतील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या  सोहळ्याचे थेट प्रसारण करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.श्री काळाराम मंदिराचा आनंद सोहळा शनिवारी सकाळी सामुदायिक ढोल प्रदक्षिणा झाली त्यानंतर दया कुलकर्णी यांचे कीर्तन तर दुपारी माहेश्वरी महिला मंडळाचे सुंदर कांड प्रमुख पठण झाले. रात्री नाशिक मधील विविध गायकांनी भावगीते , भक्ती गीते सादर करीत आपली सेवा रुजू केली.  

रविवारी सकाळी सात वाजता वेदमूर्ती भालचंद्र शास्त्री शौचे यांच्या उपस्थितीत सामुदायिक रामरक्षा पठण करण्यात आले, दया कुलकर्णी यांचे कीर्तन दुपारी आर्ट ऑफ लिव्हींगच्या सारंग गोसावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी "स्वागत श्रीराम" भजन संध्या हा कार्यक्रम सादर केला.  यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

या सोहळ्याच्या निमित्ताने राम मंदिर व आजूबाजूच्या छोट्या मोठ्या मंदिरांवरही विद्युत रोषणाई करण्यात आल्याने परिसर अखंड उजळून गेला होता तसेच रामधून व ध्वनी क्षेपणाद्वारे भावगीते भक्ती गीतांचे सादरीकरण करण्यात येत असल्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. स्वीकारांचा मोठा सहभाग घेऊन परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





इतर बातम्या
Join Whatsapp Group