भाजप नेत्यांवरील ईडीची कारवाई दाखवा आणि १ लाख रुपये बक्षीस मिळवा
भाजप नेत्यांवरील ईडीची कारवाई दाखवा आणि १ लाख रुपये बक्षीस मिळवा
img
Dipali Ghadwaje
केंद्र सरकार आपल्याकडे असलेल्या केंद्रीय यंत्रणांचा दुरउपयोग करत आहेत आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी कारवाई केली जात आहे, असा आरोप विरोधक सातत्याने करतायत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात येत त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
 
दरम्यान "भाजपमधील नेत्यांवर झालेली ईडीची कारवाई शोधून दाखवा आणि १ लाखांचं बक्षीस मिळवा", असा मजकूर लिहिलेलं फलक नंदुरबारमध्ये लावण्यात आलं आहे. सध्या या फलकाची शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात तळोदा शहर आणि तालुक्यात राष्ट्रवादीच्यावतीने भाजपविरोधी हे फलक लावण्यात आलेय. सध्या हे फलक चर्चेचे विषय ठरले आहे. तळोदा शहर अध्यक्ष योगेश मराठे यांनी भाजपच्या नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि १ लाखाचे बक्षीस मिळवा अशा आशयाचे मार्मिक फलक लावले आहे.

ज्यांच्यावर भाजपा नेत्यांनी आरोप केला ईडीची चौकशी लावली ते नेते भाजपासोबत गेल्यावर पवित्र झाल्याचा टोला देखील या बॅनवरून लावण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार २ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचा दौऱ्यावर येत आहेत. त्यात १ फ्रेब्रुवारीलाच असं फलक त्यांना डिवचण्यासाठी तर लावले नाहीना अशी चर्चा रंगत आहे.
BJP | ed raid | ED |
इतर बातम्या
Join Whatsapp Group