दहा हजारांची लाच स्वीकारताना सहाय्यक  पोलीस निरीक्षकासह शिपायास अटक
दहा हजारांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षकासह शिपायास अटक
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन जगनाथ शिंदे (वय 39, रा. गणेशनगर, अभोणा, ता. कळवण, जि. नाशिक) व पोलीस शिपाई), कुमार गोविंद जाधव (वय 42, पोलीस ठाणे वसाहत, अभोणा, ता. कळवण, जि. नाशिक) अशी लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार शिंदे व पोलीस शिपाई जाधव हे काल (दि. 3) तक्रारदाराकडून स्वीकारणार असल्याची माहिती मिळाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलिमा डोळस, पोलीस हवालदार पंकज पळशीकर, नितीन कराड व सुरेश चव्हाण यांनी सापळा रचून दोघांनाही लाच घेताना अटक केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group