नाशिकमधील धाडीत IT अधिकाऱ्यांना सापडलं ८५० कोटींचं घबाड?
नाशिकमधील धाडीत IT अधिकाऱ्यांना सापडलं ८५० कोटींचं घबाड?
img
Dipali Ghadwaje
नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले आहे. मागील आठवड्यात ही छापामारी करण्यात आली होती. सलग चार ते पाच दिवस 8 हून अधिक ठिकाणी ही छापामारी झाली असल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील आयकर विभागाच्या धाडीत अधिकाऱ्यांना मोठं घबाड सापडलं आहे. नाशिकच्या कंत्राटदारांचे जवळपास ८५० कोटींचे बेहिशेबी व्यवहार या धाडीत उघड झाले आहेत. आयकर विभागाच्या सलग पाच दिवस चाललेल्या छाडसत्रात ८ कोटींची रोकड आणि ३ कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.  
 
आयकर विभागाच्या पथकाकडून शहरातील आठ शासकीय कंत्राटदारांची कार्यालये आणि निवासस्थानी हे छापा सत्र सुरु होतं. बेहिशोबी व्यवहारांची कागदपत्रे आयकर विभागाकडून जप्त केल्याची माहिती मिळत आहे.  
 
दरम्यान राजकीय पक्षाशी संबंधित काही व्यक्तींच्या देखील या कंत्राटदारांकडे गुंतवणूक केल्याची कागदपत्रे विभागाला सापडली आहेत. या कारवाईनंतर कोणता राजकीय नेता आयकर विभागाच्या रडारवर येतो, याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group