मुंबई : राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच, आता सर्वच पक्षाच्या हालचाली देखील वाढू लागल्या आहेत. २७ फेब्रुवारी रोजी देशात ५६ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. यापैकी ६ खासदार राज्यसभेत जाणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून ६ जागांची निवड होणार आहे. त्यापैकी भाजपच्या तीन जागा असणार आहेत. या तीन जागांसाठी सहा जणांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाची वर्णी लागेल का याची ही चर्चा होतेय. याकरता इच्छुक असणारे नेते फिल्डिंग लावताय.
तसेच राज्यसभेच्या 3 जागांसाठी भाजपकडून नारायण राणे, विनोद तावडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांची नावं चर्चेत आहे यापैकी ३ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
राज्यसभेच्या 56 पदांसाठी 17 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. राज्यातून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन, काँग्रेसचे कुमार केतकर, ठाकरे गटाचे मंत्री अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांची खासदारकीची टर्म संपणार आहे.