नाशिकच्या विविध भागांतून तीन मुलींचे अपहरण
नाशिकच्या विविध भागांतून तीन मुलींचे अपहरण
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहरातील वेगवेगळ्या तीन ठिकाणांहून अज्ञात इसमांनी कशाचे तर आमिष दाखवून पळवून नेत तीन मुलींचे अपहरण केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अपहरणाचा पहिला प्रकार मखमलाबाद रोड येथे घडला. फिर्यादी हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची मुलगी सुदर्शन कॉलनी येथील घरी एकटीच होती. त्यावेळी अज्ञात इसमाने या मुलीला काही तरी फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. बराच वेळ होऊनही मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या पालकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

अपहरणाचा दुसरा प्रकार अशोकस्तंभ परिसरात घडला. फिर्यादी हे अशोकस्तंभ परिसरात राहतात. दि. 2 नोव्हेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत आरोपी सागर कुमावत व अभिषेक कुमावत (दोघांची पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत) यांनी फिर्यादीच्या मुलीस प्रेमाचे आमिष दाखवून तिला घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, तसेच ही मुलगी काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. ती बराच वेळ होऊनही घरी परतली नाही, म्हणून तिच्या पालकांनी तिचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही.

या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आरोपी सागर कुमावत व अभिषेक कुमावत यांच्याविरुद्ध मुलीच्या अपहरणाची फिर्याद नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.

अपहरणाचा तिसरा प्रकार अंबड परिसरात घडला. फिर्यादी यांची मुलगी राहत्या घरातून उत्तमनगर येथे कॉलेजला जाऊन येते, असे सांगून गेली. ती अद्यापपर्यंत घरी आली नाही, त्यावरून या मुलीचे अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. यावरून अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group