माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात: अपघात की घातपात? अशी शंका
माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात: अपघात की घातपात? अशी शंका
img
Dipali Ghadwaje
भंडारा : माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाचा भीषण अपगात झालाय. या अपघातात डॉ.परिणय फुके थोडक्यात बचावले  आहे.  डॉ. परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. सभा आणि गावकऱ्यांशी चर्चा आटोपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत असताना रात्री दोन वाजताच्या सुमारास साकोलीजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना हा अपघात झाल्याने एकच खळबळ उडालीये. अशात हा अपघात आहे की घातपात याबाबत शंका उपस्थित केली जातेय.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. अपघातात त्यांच्या ताफ्यातील एका कारचा पूर्णता चक्काचूर झाला आहे. सुदैवाने डॉ. फुके या बचावलेत.

लोकसभा निवडणुकासाठी आपला उमेदवार निवडून यावा यासाठी सध्या सर्वच पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचाराला जोर लावला आहे. भंडारा लोकसभा मतदार संघातून महायुतीने सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर केलीये. मंगळवारी त्यांच्या प्रचारासाठी डॉ.फुके अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते.

येथे त्यांनी प्रचारानंतर सभा घेतली. उपस्थित गावकऱ्यांशी देखील संवाद साधला. हा कार्यक्रम उरकल्यानंतर रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत होते. त्यावेळी मध्यरात्री 2 च्या सुमारास एका अज्ञात वाहनाची त्यांच्या वाहनाला धडक बसली. वाहन चालक यात वेळीच सावध झाल्याने मोठी दुर्घटना घडता घडता टळली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group