भीषण अपघातात भार्डीचे बाप - लेक ठार...
भीषण अपघातात भार्डीचे बाप - लेक ठार...
img
Dipali Ghadwaje
मनमाड प्रतिनिधी  (नैवेद्या बिदरी ) : इंदौर - पुणे राष्ट्रीय महामार्ग वर मनमाड नजीक असलेल्या जळगाव चोंडी येथे भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने दुचाकी स्वराला धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडला.

या अपघातामध्ये भार्डी येथील रहवासी दुचाकी वरील बाबुराव मार्कंड आणि सागर मार्कंड यांच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बाप लेकाचा जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.

दरम्यान जळगाव चोंडीचा आठवडे बाजार असल्याने बकरी विकण्यासाठी भार्डी येथील बाप-लेक आले असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होत होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group