मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील भीषण दुष्काळाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. राज्यात अनेक राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये पाणी पातळीने तळ गाठला असून हंडाभर पाण्यासाठी खेडापाड्यातील लोकांना कैक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. पावसाने राज्यात जर का उशीरा हजेरी लावली तर राज्यातील पाणीटंचाईची समस्या आणि दुष्काळाची परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. रा
“राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. ४० तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. राज्यात सध्या ७३ टक्के दुष्काळ आहे. १५०० महसूल मंडळात दुष्काळ आहे. संभाजी नगर आणि पुण्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. संभाजी नगरमध्ये १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्यात १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकमध्ये २२ टक्के पाणीसाठा शिक्कल आहे. कोकणात २९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या धरणात सध्या पाणीसाठा हा कमी आहे. उजनीमध्ये उपयुक्त जलसाठा शून्य आहे. जायकवाडीत ५ टक्के पाणीसाठा हा शिल्लक आहे. मांजरा धरणात सध्या शून्य टक्के पाणीसाठा आहे. पाऊस पडेल पण धरणात पाणीसाठा हा जमा होण्यास आपल्याला जुलैची वाट बघावी लागणार आहे”, असं शरद पवार सांगत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.
“संभाजीनगरमध्ये १५६१ गावात दुष्काळ आहे. तिथे १०३८ पाण्याचे टँकर चालत आहेत. पुणे विभागात सध्या ६३५ गावात टँकरने पाणीपुरवठा केलं जात आहे. १०५७२ गावात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी ११०८ गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. जनावरांच्या चाऱ्याची मागणी सध्या आहे. पण जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा हा आत्ता उरला आहे”, असं शरद पवार म्हणाले.