नासिक - अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सतत भेसळयुक्त पदार्थांवरील कारवाई ही सुरूच असून आज जिल्ह्यातील दिंडोरी येथे गुजरात वरून भेसळ युक्त माल घेऊन येत असताना लाखो रुपयाचं माल जप्त केला आहे.
सातत्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये दुसऱ्या राज्यातून विशेष करून गुजरात व लगतच्या अन्य राज्यातून येणाऱ्या भेसळयुक्त युक्त पदार्थांवर कारवाई ही केली जात आहे. सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन ही या कारवाईचा वेग देखील अन्न व औषध प्रशासन विभागाने वाढविला आहे. त्यामुळे रोज कुठे ना कुठेतरी भेसळयुक्त पदार्थ हे जप्त केले जात आहे.
अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखा, यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक पेठ रस्त्यावर वाहन क्रमांक एम एच १५ एच एच ००२१ बोलेरो या वाहनातुन गुजरात राज्यातुन सणासुदीच्या काळात गुजरात उत्पादीत हलवा व स्विटस (खडोल) याचा एकुण ५० बॅग साठा नाशिककडे विक्रीसाठी येत असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन विभाग व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
ही गाडी दिंडोरी जवळ आली असताना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने वाहनाला थांबावुन तपासणी केली असता या वाहनास अन्न पदार्थ वाहतुक करण्याकरीता अन्न परवाना आढळुन आला नाही. तसेच या अन्न पदार्थाची वाहतुक आवश्यक तापमानास न केल्याने वरील दोन्ही अन्न पदार्थांचे अन्न नमुने अन्न सुरक्षा अधिकारी
योगेश देशमुख यांनी तुलसाराम राजाराम चौधरी यांच्याकडून विश्लेषणासाठी घेवुन सदरचा साठा हलवा १ हजार १९८ किलो किंमत रुपये २ लाख ३९ हजार ६०० रुपयांचे तसेच स्विटस (खडोल) चा २९८ किलो ६२ हजार ५८० रुपये किमतीचा असा एकूण ३लाख ०२ हजार१८० रुपये किंमतीच माल जप्त करुन ताब्यात घेतला.
पुढील चौकशी सुरु आहे. हि कार्यवाही ही अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी नाशिक विभागाचे सह आयुक्त सं. भा. नारगुडे, , सहायक आयुक्त (अन्न) विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.