चाहूँगा मैं तुझे साँझ-सवेरे.... जीवाला जीव देणाऱ्या मित्रांची रेल्वे खाली जीव देऊन आत्महत्या
चाहूँगा मैं तुझे साँझ-सवेरे.... जीवाला जीव देणाऱ्या मित्रांची रेल्वे खाली जीव देऊन आत्महत्या
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): "जिंदगी के सफर मे कई दोस्त बनते है, वक्त के साथ कई दोस्त छुट जाते है, लेकिन जो वक्त के साथ आप का हात कभी नही छोडे वही सच्चा दोस्त है."या शायरी शनिवारी खरी ठरली.

बालपणा पासून सोबत असलेल्या नाशिकरोड मधील पूर्व भागातील दोन मित्रांनी रेल्वे खाली स्वतः ला झोकून आत्महत्या केली. या दोघांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे तसेच दोघेही काम धंदा करून घरच्यांना मदत करत होते. या होतकरू आणि गरिबा घरच्या मुलांच्या अचानक झालेल्या एक्झिट मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सचिन करवर राहणार कपाट कारखाना मागे, गिते मळा, नाशिकरोड आणि संकेत राठोड राहणार म्हसाबो मंदिरा, गिते मळा,या सतरा वयोगटातील दोन तरुण लहपणापासून एकत्र शिकले, नुकतेच ते अकरावी पास झाले. लॅमरोड वरील एका महाविद्यालयात बारावी साठी त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु होती. दोघांची घरची परिस्थिती जेमतेम होती. सचिन चे वडील मालधक्का मध्ये तर संकेत चे वडील मिस्तरी काम करून घरचा उदरनिर्वाह करीत होते.

नेहमी सोबत असणाऱ्या या दोघा मित्राच्या मनात घालमेल झाली आणि नियतीने डाव साधला. दोघांनी एकत्र येत रेल्वे च्या वालदेवी नदी च्या पुला वरील पोल क्र185/19 जवळ उभे राहून मुबंई वरून नाशिकरोड कडे येणाऱ्या गाडी नंबर 22121 लौखनो सुपर फस्ट एक्सप्रेस स्वतः ला झोकून आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी या मित्रांनी आपल्या स्वतःच्या मोबाईल स्टेस्टस वर "भावपुर्ण श्रद्धांजली"असे पोस्ट केल्याचे स्थानिक मित्रांनी सांगितले

आत्महत्याचे कारण स्पष्ट झाले नसून लोहामार्ग पोलीस ठाण्यात आस्कमीत मृत्यू ची नोद करण्यात आली आहे. आज रविवारी दुपारी त्यांच्या वर देवळाली गाव येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या मित्राच्या अपघाती निधनाने परिसरात शोककाळा पसरली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group