वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा;  शिंदे सरकारकडून प्रत्येक दिंडीला मिळणार इतक्या हजारांचं अनुदान !
वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा; शिंदे सरकारकडून प्रत्येक दिंडीला मिळणार इतक्या हजारांचं अनुदान !
img
Jayshri Rajesh
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प  सादर करण्यास सुरुवात करताना वारकरी संप्रदायाबाबत मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत केला .

अजित पवार यांनी संत तुकारामांच्या अभंगानं अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. आषाढी वारीतील दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये निधी, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, वारीला जागतिक वारसा नामांकन मिळवून देणे आणि मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचं अजित पवार सांगितलं. संत तुकाराम महाराजांच्या अभंगानं सुरुवात करत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.  

महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या आहेत. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान होत आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीहून निघेल. हजार वर्षाची परंपरा असलेल्या वारीशी वारकऱ्यांची नाळ जोडलेली आहे.


महाराष्ट्राची नाळ वारकरी भक्तिमार्ग जोडलेली आहे. याची जाणीव असल्यानं महाराष्ट्राची ओळख म्हणून पढंरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी यूनेस्कोकडे प्रस्ताव पाठवत आहोत. आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून प्रति दिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

निर्मल वारीसाठी 36 कोटी71 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून देहू आणि आळंदी या मार्गावरील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत. वारकरी, भजनी मंडळ यांना सोयी सुविधा देण्यासाठी, पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी वारकरी व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ  स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असं अजित पवार म्हणाले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group