धक्कादायक घटना; नाशिक मध्ये हिट एण्ड रन..  बारदान फाटा येथे महिलेला चिरडले
धक्कादायक घटना; नाशिक मध्ये हिट एण्ड रन.. बारदान फाटा येथे महिलेला चिरडले
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक - नाशिक शहरात  हिट एण्ड रनची घटना घडली असून यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.  यामुळे नाशिक मध्ये ही आता अशा घटना घडू लागल्या आहेत.

मागील काही दिवसापासून सातत्याने मुंबई पुणे येथे भरधाव गाडीने उडून देण्याच्या घटना म्हणजेच हिट अँड रन च्या घटना या सातत्याने घडत आहे. नाशिक मध्ये देखील अशा स्वरूपाच्या घटना घडू लागल्या असून अशीच घटना दोन दिवसापूर्वी सिडकोतील कामटवाडा रोड वर घडली होती. 

या ठिकाणी एका जीप चालकाने दारू पिऊन चार ते पाच जणांना धडक दिल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा मंगळवारी सायंकाळी नाशिक मध्ये अशीच घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गंगापूर रोडवरील बारदान फाटा या ठिकाणी रस्त्याने पायी जाणाऱ्या अर्चना किशोर शिंदे ही महिलेला  पाठीमागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या गाडीने या  धडक दिली.  त्यामध्ये ही महिला जागीच मरण पावली असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने गंगापूर पोलीस घटनास्थळी पोहोचली. या पुढील पोलीस कारवाई सुरूआहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group