मुंबई :- मराठा आरक्षणासाठी एखाद्या आमदार वा खासदाराने राजीनामा दिल्याची पहिलीच घटना घडली आहे.
हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील आरक्षणाची मागणी करावी यासाठी काही आंदोलक त्यांना भेटायला गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. हेमंत पाटलांनी तत्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.
हेमंत पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत मराठा बांधवांनी खासदार हेमंत पाटील यांना घेराव घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली यवतमाळच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना येथे खासदार पाटील आले असता त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. यावेळी आमदार खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा आरक्षणप्रश्नी आपण दिल्ली येथे खासदारांची बैठक बोलाविली मात्र मराठा बांधवांची मागणी असेल तर एक मिनिटात राजीनामा देतो असे त्यांनी यावेळी सांगितले व लागलीच आपला राजीनामा लिहिला.