बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे. दरम्यान, आता याचा फटका राजकीय पक्षांना देखील बसतांना पाहायला मिळत आहे. कालच खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला असतांना, आज बीड जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाच्या ३६ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत मराठा आरक्षणाला आणि जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवला आहे.
केजचे तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे देण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले होते. त्यानंतर थोरात यांच्यासह इतर 36 पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
29 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देऊन युवा सेना, शिवसेना, वाहतुक सेना पदाधिकाऱ्यांनी आंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी अन्नपाणी त्यागून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्याचे एकमताने ठरले. तसेच युवासेना तालुकाप्रमुख, वाहतुक सेना तालुकाप्रमुख, युवासेना विधानसभा प्रमुख, शिवसेना उपशहरप्रमुख, शिवसेना व युवासेना उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, सर्कलप्रमुख, शाखाप्रमुख असे एकूण 36 पदाधिकाऱ्यांनी विश्रामगृह केज येथील बैठकीत पक्षाच्या पदाचे आपल्या हस्ताक्षरात स्वेच्छेने राजीनामे दिले.
यामध्ये युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, सुधीर जाधव, ज्ञानेश्वर बोबडे, के बबलु इंगळे, शिवसेना उपशहरप्रमुख पप्पु ढगे, अनिरुद्धा मुळे, अमोल चौधरी, राहुल जाधव, विशाल गायकवाड, चंद्रकांत चटप, शिवाजी थोरात, सुरज सौंदणे, नंदकिशोर चौधरी, प्रदीप काळे, सागर जाधव, परमेश्वर साखरे, विश्वास राऊत, लखन सौंदणे, सतिश अंबाड, सुरज चौधरी, विशाल अंबाड, दिपक करपे, आकाश चटप, किशोर जाधव, सागर जाधव, शिवाजी बोबडे, स्वप्निल थोरात, ज्ञानेश्वर बोराडे, शरद इंगळे, सुनिल बप्पा जाधव, भाऊ शिंदे, कचरु थोरात, अशोक थोरात, सतिश कोकाटे, आदित्य कोटुळे, शाम गव्हाणे, विजय बोबडे, संतोष बोबडे, विठ्ठल बोबडे, नवनाथ क्षीरसागर या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वेच्छेने राजीनामे दिले आहे.