![दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शाह यांना पंचवटी भूषण पुरस्कार जाहीर](https://dainikbhramar.com/assets/uploads/news/uasd88iw.jpg)
७ फेब्रुवारी २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शाह यांना यंदाचा पंचवटी भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पंचवटी सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक कै. अॅड. उत्तमराव नथुजी ढिकले यांच्या ८५ व्या जयंती निमित्त दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार (दि. १०) रोजी सायंकाळी ५.३० वा. पंचवटी वाचनालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात माजी खासदार डॉ. प्रतापराव वाघ यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत केले जाणार असून विशेष अतिथी म्हणून आ. अॅड. राहुल ढिकले उपस्थित राहणार आहेत. तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे व मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शाह यांना पंचवटी भूषण तर मयूर विधाते, श्रेयस कापूरे, विक्रम गवांदे, रजनिश गायकवाड यांना पंचवटी गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कोषाध्यक्ष प्रा. डॉ. शांताराम रायते, कार्यवाह ग्रंथमित्र नथुजी देवरे, धनंजय धनवटे, हिरालाल परदेशी, उल्हास धनवटे, सुभाष पाटील, मंदार जानोरकर, प्रा. डी. के. गोसावी, अॅड. राहुल मुखेडकर, धिरज पाटील, संजय नेरकर, राकेश ठक्कर, सुहास खालकर, ग्रंथपाल योगिता भामरे, निकेतन शिंदे आदी पदाधिकार्यांनी केले आहे.
Copyright ©2025 Bhramar