अजित पवारांना डेंग्युमुळे अशक्तपणा, १०१ अंश सेल्सिअस ताप, डॉक्टरांनी दिली माहिती
अजित पवारांना डेंग्युमुळे अशक्तपणा, १०१ अंश सेल्सिअस ताप, डॉक्टरांनी दिली माहिती
img
Dipali Ghadwaje
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना डेंग्यूची लागण झालीय. अजित पवार यांना 101 इतका ताप आहे. त्यांना प्रचंड विकनेस जाणवतोय. त्यांना त्यांच्या घरीच सलाईन लावली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशीदेखील कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. उद्या त्यांच्या प्लेट्सलेटबाबतची महत्त्वाची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान अजितदादांना गेल्या चार-पाच दिवसांपासून डेंग्यूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे गरज पडल्यास अॅडमिट देखील करण्यात येणार आहे. डॉ. कापोटे म्हणाले, "अजितदादांना आता सुद्धा 101 ताप आहे. तसेच प्रचंड विकनेस आहे. अजून त्यांना विश्रांतीसाठी घरीच ठेवले आहे. डेंग्यू हा व्हायरस डिसीज आहे. त्यामुळं लागण झालेल्या व्यक्तीला विकनेस खूप येते. सध्या त्यांच्या प्लेटलेट्स 80 हजार इतक्या आहेत. उद्या पुन्हा प्लेटलेट्स टेस्ट करण्यात येणार आहे. जर गरज लागली तर ऍडमिट करावं लागणार आहे" 

अजित पवारांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या’
“अजित पवार यांच्या प्लेटलेट्स कमी होत चालल्या आहेत. आधी 1 लाख 60 हजार होत्या. आज 88 हजारवर आल्या आहेत. त्याचबरोबर पांढऱ्या पेशीदेखील कमी झाल्या आहेत. आम्ही उद्या प्लेटलेट्स चेक करणार आहोत. त्यात विशेष काही सापडलं तर आम्ही एखाद वेळेस रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेऊ. त्यांना सध्या तरी सलाईन आणि इतर औषधी चालू आहेत. त्यांना प्रचंड थकवा आलाय. त्यामुळे त्यांना विश्रांतीची खूप गरज आहे”, अशी माहिती डॉक्टर संजय काकोटे यांनी दिली.

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे सरकारपुढील दबाव वाढताना दिसतोय. मराठा कार्यकर्ते ठिकठिकाणी आक्रमक होताना दिसत आहेत. राज्यातील काही भागांमध्ये रस्ते अडवून टायर जाळल्याचे प्रकार घडले आहेत. तर बीडमध्ये हिंसक आंदोलनामुळे संचारबंदीचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागलाय. जालना जिल्ह्यातही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या घडामोडींदरम्यान अजित पवार सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group