नाशिक :- पंचवटीतील एका खासगी जागेत आज सकाळी एका युवकाचा मृतदेह संशयस्पद रित्या आढळून आला. मात्र, या इसमाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मयत शांतीलाल आणि आरोपी संतोष अहिरे हे दोघे एकत्र काम करतात. काल रात्री दोघे एका खासगी जागेत दारू पीत बसले होते. दारू पीत असताना दोघांमध्ये वाद झाले.
त्यावेळी संतोषने शांतीलालला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर त्याने पाठीमागून येत शांतीलालच्या डोक्यात दगड घातला. घटनेनंतर तो तिथून पसार झाला होता. पोलिसांनी कुठलेही धागेदोरे नसताना तपासाची चक्रे फिरवत शिताफीने संतोषला ताब्यात घेतले.
त्याने पोलिसांकडे गुन्ह्यांची कबुली दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत.