बारामती तालुक्यात दादांचाच 'विजयी गुलाल'; सर्वाधिक ग्रामपंचायतींवर फडकवला झेंडा
बारामती तालुक्यात दादांचाच 'विजयी गुलाल'; सर्वाधिक ग्रामपंचायतींवर फडकवला झेंडा
img
Dipali Ghadwaje
राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकांची धुलवड सुरू आहे. राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथीनंतर या निवडणूका सर्वांसाठीच प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत गुलाल कोण उधळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. 

अशातच राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांचे निकाल समोर यायला सुरूवात झाली आहे. यावेळी सर्वाधिक चुरशीची ठरलेल्या बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल हाती आली असून अजित पवार गटाने सर्वाधिक जागांवर विजयी गुलाल उधळला आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालांची मोजणी सुरू आहे. बारामती तालुक्यातील एकूण ३१ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरू असून आत्तापर्यंत २३ ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहेत.

निकाल लागलेल्या ३१ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २६ ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने झेंडा फडकवला आहे. तर एका ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता मिळवली आहे. बारामती हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी एक ही पॅनल उभे केले नव्हते.

 अजित पवार गटाने जिंकलेल्या ग्रामपंचायती..
भोंडवेवाडी, म्हसोबा नगर, पवई माळ, आंबी बुद्रुक, पानसरे वाडी, गाडीखेल, जराडवाडी, करंजे, कुतवळवाडी, दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी, साबळेवाडी, उंडवडी कप, काळखैरेवाडी, चौधरवाडी, वंजारवाडी, करंजे पूल, धुमाळवाडी, कऱ्हावागज, सायबाचीवाडी, कोराळे खुर्द या ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचा झेंडा फडकला आहे. तर चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवत बारामती तालुक्यात खाते उघडले आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group