Nashik : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार
Nashik : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पीडित तरुणीचे नगर जिल्ह्यातील संदीप नितीन साळवे या युवकाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या जाळ्यात ओढले. त्याने 10 फेब्रुवारी 2022 ते 28 डिसेंबर 2023 या कालावधीत तिच्यावर ठिकठिकाणी लैंगिक अत्याचार केले.

तिने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर त्याने टाळाटाळ केल्याचे तिच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच तिने संदीप साळवे विरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक हंडोरे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group