नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दुचाकी गाड्यांवर फिरत सहा ते सात टवाळखोरांनी दोन गाड्यांच्या काचा फोडून नुकसान केले. या समजकांटकांच्या दोन दुचाकी सतर्क असलेल्या नागरिकांमुळे पोलिसांच्या ताब्यात मिळाल्या.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नाशिकरोड येथील फर्नांडीस वाडी ते सद्गुरू नगर येथील श्री बाल्मिकी महाराज मंदिरा जवळ काल रात्री लावलेल्या कुणाल लोहट यांचा छोटा हत्ती व झेडगेकर यांची ट्रीबर कार क्रMH 15HG 3372या दोन चारचाकी गाड्यांच्या काचा सहा ते सात टवाळखोरांनी फोडल्या. दरम्यान काही नागरिक काचा फोडण्याच्या आवाज ऐकून घरा बाहेर आले, नागरिकांचा जमाव पाहून टवाळखोर घाबरले त्यात ते दोन दुचाकी गाड्या सोडून पळून गेले.
घटनेची माहिती समजताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, उपनिरीक्षक सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार होलगीर करीत आहे. मात्र असं असलं तरी काही दिवसापासून शांत असलेल्या गुन्हेगारी पार्शवभूमी असलेल्या टवाळखोरांनी पुन्हा डोके वर काढल्याने पोलिसांनाची डोकेदुखी वाढली आहे.