हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. व्हिस्टेक्स एशिया या कंपनीचा सिल्व्हर ज्युबली सोहळा याठिकाणी सुरू होता. यावेळी स्टेजवरुन पडून कंपनीचे सीईओ संजय शाह यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या महतीनुसार, हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये व्हिस्टेक्स एशिया या कंपनीचा सिल्व्हर ज्युबली सोहळा याठिकाणी सुरू होता. यावेळी स्टेजवरुन पडून कंपनीचे सीईओ संजय शाह यांचा मृत्यू झाला.कंपनीच्या कार्यक्रमादरम्यान क्रेन कोसळल्याने अपघाती मृत्यू झाला आहे. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. क्रेन कोसळल्याने कंपनीचे उपाध्यक्ष विश्वनाथ राजू गंभीर जखमी झाले. ही घटना कॅमेरात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हैद्राबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये कंपनीचा 25 वा वर्धापन दिन साजरा करत असताना अर्नथ घडला. 18 आणि 19 जानेवारी हा कार्यक्रम होता. कंपनीचे सीईओ असलेले संजय शाह हे या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी 700 लोक उपस्थित होते. दरम्यान, ज्या क्रेनमधून सीईओ स्टेजवर एंट्री करणार होते, ते 20 फुट उंचीवर एक स्टेज तयार करण्यात आले होते.
क्रेनच्या साहाय्याने व्यासपीठावर येणार होते. दुर्दैवाने क्रेनची दोरी एका बाजून तुटली. त्यामुळे संशय शहा थेट व्यासपीठावर पडले. 20 फुट अंतरावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले. क्रेन व्हाईस चेअरमन विश्वनाथ राजू यांना ही धडकले. या घटनेत दोघे ही गंभीर झाले. तात्काळ दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान संशय यांचा मृत्यू झाला.