इंडिया आघाडीत बिघाडी! तृणमूल काँग्रेस एकट्याने लोकसभा लढणार, ममता बॅनर्जींची घोषणा
इंडिया आघाडीत बिघाडी! तृणमूल काँग्रेस एकट्याने लोकसभा लढणार, ममता बॅनर्जींची घोषणा
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकजूट करत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. पण आता याच इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाविरोधात एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकला चलो रे ची भूमिका जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक राज्यात एकट्याने लढणार असल्याचे ममता यांनी जाहीर केले आहे. आपण दिलेला जागा वाटपाचा प्रस्ताव काँग्रेसने मान्य न केल्याने हा निर्णय घेतल्याचे ममता यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जींनी केली आहे. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, "माझी काँग्रेसशी कोणतीही चर्चा झालेली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हणत आले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही"

 

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group